शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाकडे पोहोचला आहे. येत्या ६ ऑक्टोबरला त्यावर निर्णय येण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी निर्णयाबाबत भीती व्यक्त केली आहे. त्यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबत कशाप्रकारे निकाल दिला होता हे सांगत त्यांनी आयोगावर टीकास्त्र डागलं. मुंबईत त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.