महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात मागील २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १२ नवजात बालकांचाही समावेश आहे. अवघ्या २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, “राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघाले आहेत. नांदेडमध्ये मेडिकल कॉलेज मध्ये २४ जणांचा मृत्यू झाला आणि त्यात १२ नवजात बालके होती. या मृत्यूला शासन जबाबदार आहे”