महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात मागील २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १२ नवजात बालकांचाही समावेश आहे. अवघ्या २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेवर प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. ” नांदेडसारख्या ठिकाणी, सरकारी रुग्णालयात २४ तासात २४ मृत्यू होतात, यामुळे राज्य सरकार अस्तित्वातच नाहीये असं म्हणता येईल. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शासकीय रुग्णालयात ही परिस्थिती आहे. थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल तर मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा ताबडतोब घेतला पाहिजे”