कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रेची घोषणा केली आहे. ते कायम तरुणांचे प्रश्न मांडत असतात. तरुणांशी संवाद साधला जावा या उद्देशाने पदयात्रा काढली जाणार आहे. ही पदयात्रा दसऱ्याला पुण्यापासून सुरू होणार असून नागपूरला ती संपेल. एकूण ८४० किलोमीटरची ही यात्रा असेल. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. त्यामुळे रोहित पवार महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहेत का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे.