मराठा आरक्षणामुळे चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज (3 ऑक्टोबर) बीड जिल्ह्यात ते दाखल झाले असून माजलगाव तालुक्यातील तेलगाव येथे त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. जवळपास एक क्विंटल फुलांचा हार आणि फुलांची पुष्पवृष्टी करत जरांगे यांचं माजलगाव येथे स्वागत करण्यात आलं. यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.