आम्हाला काँग्रेसचा आणि इतर पक्षांचा जितका त्रास होत नाही तितका त्रास भाजपाचा आहे. माझ्या मतदारसंघात भाजपाचा सगळ्यात जास्त त्रास होतोय, असं विधान प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. तसंच भाजपाने आपल्याबरोबर असलेल्या लोकांसाठीच फिल्डिंग लावायची हे उद्योग बंद केले पाहिजेत, असा टोलाही त्यांनी लगावला. मंगळवारी (३ ऑक्टोबर) अकोला येथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.