भाजपा नेत्या पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडं १९ कोटी रूपयांची जीएसटी रक्कम थकली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील जीएसटी
विभागाने कारखान्याला नोटीस बजावली आहे. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या पंकजा मुंडे यांच्या मदतीसाठी आता त्यांचे कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत. काही कार्यकर्त्यांनी पैसे गोळा करून तर काहींनी चेकही पंकजा मुंडेंना पाठवले आहेत. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.