अजित पवार आणि मुख्यमंत्री पदाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्यासाठी कारण ठरलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान. एकनाथ शिदें हेच सध्या राज्याचे मुख्यमंत्री राहतील. अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची वेळ आली तर पाच वर्षांसाठी करू, असं फडणवीस म्हणाले. त्यांच्या या विधानाला आता राष्ट्रवादीचे नेते तथा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरामबाबा अत्राम यांनी दुजोरा दिला आहे. दादा मुख्यमंत्री होणार हे पक्कं आहे. फडणवीसांचीही त्यांना साथ आहे, असंही अत्राम म्हणाले.