उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्याच्या पालकमंत्री पदी वर्णी लागली आहे. गेल्या सरकारमध्ये ज्या अजित पवारांच्या कारभारावरून आरोप केला जात होता. त्यांच्याकडेच पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली. त्याबद्दल पणन मंत्री अब्दुल सत्तार यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले, केंद्रातील भाजपचे आणि आमच्या वरीष्ठ नेत्यांनी अजित पवार यांना सोबत घेण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय आम्हाला मान्य असून आमच्यासोबत अजितदादा आल्याने त्यांच्या अनुभवाचा निश्चित फायदा होईल, असं ते म्हणाले. तसंच मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.