आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात २५ तारखेला युवा संघर्ष यात्रा सुरू होणार आहे. यानिमित्ताने त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार यांनी आता पक्षावरच दावा ठोकला आहे. त्यावरून प्रश्न विचारला असता रोहित पवार म्हणाले की, दावा ठोका, पक्ष फोडा नाहीतर कुणाबरोबर तुम्ही जा. पद तुम्हालाच मिळणार आहे. त्यांचा हा पदाचा लढा आहे. आमचा लढा हा युवांचा, विचारांचा आणि महाराष्ट्र धर्माचा आहे.