शनिवारपासून पेलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये मोठा संघर्ष पेटला आहे. हमास या दहशतवादी संघटनेनं गाझातून इस्रायलमध्ये सोडलेल्या रॅाकेट्सने शेकडोंचा बळी घेतला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलकडूनही हमासवर हवाई हल्ले करण्यात आले. दरम्यान, या संघर्षमय परिस्थितीत भारतासह अमेरिका, कॅनडा यासारख्या मोठ्या देशांनी इस्रायलला हवी ती मदत देण्याचं आश्वासन दिलं. मात्र आपल्याला कोणाच्याही मदतीची गरज नाही. आमचा लढ आम्ही स्वतः लढू, अशी भूमिका भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलोन यांनी मांडली आहे.