शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरून पुन्हा एकादा ठाकरे आणि शिंदे गटात जुंपली आहे. गतवर्षी शिवसेनेतील मोठ्या बंडखोरीनंतर दसरा मेळाव्यावरून असाच प्रश्न निर्माण झाला होता. तर यंदा देखील दोन्ही गट आमने-सामने आले आहेत. दरम्यान, शिंदे गटाने मैदानासाठी पालिकेला केलेला आपला अर्ज मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत शिंदे गटाला सुनावलं.