ससून रुग्णालयातील कैद्यांसाठीच्या वॅार्ड क्रमांक १६ मधून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील पळून जाण्याच्या घटनेला आठ दिवसांचा कालावधी झाला. मात्र अद्यापही ललित पाटील याचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश आले नाही. पण या घटनेत राज्य सरकारमधील शिंदे गटाच्या मंत्र्यांचा सहभाग असल्याचा दावा काँग्रेस पक्षाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. पुण्यात त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.