ससून रुग्णालयातील कैद्यांसाठीच्या वॉर्ड क्रमांक १६ मधून अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील पळून जाण्याच्या घटनेला आठ दिवसांचा कालावधी झाला. मात्र अद्यापही ललित पाटील याचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश आले नाही. पण या घटनेत राज्य सरकारमधील शिंदे गटाच्या मंत्र्यांचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील नेत्याचं थेट नाव घेऊन आरोप केला आहे. ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करण्याकरता दादा भुसे यांनी फोन केला होता, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.