आमदार अपात्रतेची सुनावणी १३ नोव्हेंबरला होणार होती. मात्र ही तारीख बदलून आता एक दिवस आधीच म्हणजेच १२ नोव्हेंबरला सुनावणी घेतली जाणार आहे. या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. सुनावणी एक दिवस आधी घेण्यामागचं कारण त्यांनी स्पष्ट केलं आहे. जर मला दिरंगाईचं करायची असती, तर मी तारीख पुढे ढकलू शकलो असतो, असं प्रत्युत्तरही त्यांनी विरोधकांनी दिलं आहे.