ड्रग्स तस्कर ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्याच्या घटनेला एक आठवडा झाला आहे. मात्र, अद्याप पोलिसांना त्याचा पत्ता लागलेला नाही. या प्रकरणात नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचं नाव घेत विरोधकांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत. दरम्यान, या प्रकरणातील चौकशीतून ललित पाटीलच्या पाठीमागे कोण आहे हे समोर येईल, असं दादा भुसे म्हणाले. जे पुरावे असतील ते पोलिसांना द्या, असंही आवाहन त्यांनी केलं आहे.