मराठा आरक्षणासाठी नेमलेली ‘मराठा आरक्षण समिती’ ही सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. दरम्यान, या दौऱ्यावर छत्रपती संभाजीनगर येथे असताना ‘मराठा समाजाकडे असलेले कुणबी नोंदीचे पुरावे त्यांनी सादर करावे’ असे आवाहन या समितीकडून करण्यात आले होते. यानंतर या समितीसमोर मराठा समाजातील जवळपास ७० नागरिकांनी २०० ते २५० वर्ष जुने तांब्याची भांडी व त्यावर मराठा कुणबी नोंद असलेले पुरावे समितीला दाखवले.