राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदारांना अपात्र ठरवण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान, याप्रकरणी विशेष सरकारी वकील ॲड.उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे जी सुनावणी सुरू आहे तिला स्थगिती देण्याची शक्यता आहे” अशी प्रतिक्रिया दिली.