जालना अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्या (१३ ऑक्टोबर) मराठा आरक्षण सभा होत आहे. त्यानिमित्ताने मराठा क्रांती मोर्चा बीडच्या वतीने बुधवारी समाजाची बैठक घेऊन संपूर्ण सभेचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये मराठा समाजातील लोकांची जेवण, नाश्ता, पाणी आणि बीडमध्ये मुक्कामी येणाऱ्यासाठी सोय करण्यात आली आहे. याची माहिती जरांगे पाटील यांनी स्वतः दिली.