नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील विविध मंदिराचा इतिहास आपण जाणून घेत आहोत. पुण्यातील ‘भवानी पेठ’ ही लाकूड बाजार पेठ म्हणून अनेक वर्षांपासून ओळखली जाते. या बाजारपेठेत १७६० साली तुळजापूरच्या भवानी माता मंदिरासारखंच ‘प्रति भवानी माता मंदिर’ उभारण्यात आलं. तुळजापूर येथील देवीच्या दर्शनाला सर्वांना जाणे शक्य होत नसल्याने या मंदिराची उभारणी करण्यात आलीये. या मंदिरातील भवानी मातेची मूर्ती अडीच फुट उंचीची असून ही मूर्ती वालूकामय पाषाणतील आहे, अशी माहिती विश्वस्त विनायक मेढेकर यांनी दिली.