उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीच्या फुटीर गटाचे नेते अजित पवार यांच्यावर पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपाचे प्रकरण सध्या राजकीय वर्तुळात चांगलेच गाजत आहे. यावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “टेंडर निघाले तेव्हा अजित पवार फक्त पालकमंत्री होते. आता रिटायर झाल्यानंतर त्यांनी पुस्तक लिहीलंय, त्यांनी तेव्हा तक्रार का केली नाही? तत्कालीन गृहमंत्री यांनी ते टेंडर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. उठसूठ अजित पवारांवर आरोप, हे षडयंत्र आहे” असं मुंडे म्हणाले आहेत.