अमली पदार्थ तस्करीचा आरोप असलेला ललित पाटीलच्या अखेर मुसक्या आवळण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून तामिळनाडूच्या चेन्नईतून त्याला अटक केली आहे. अटकेनंतर आजच त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केलीये.