अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार सत्तेत सहभागी झाले आहेत. पक्षात फूट पडल्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटपाचं समीकरण काय असेल? यावरून चर्चा सुरू आहे. दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात आहे. यावर रोहित पवारांनी उत्तर दिलंय.