मराठा आरक्षण आणि त्यांच्यासंदर्भात आंदोलन करणारे मनोज जरांगे हे सध्या चर्चेत आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून वातावरण तापलेलं असताना भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. “नुकतीच आरक्षणासंदर्भात महत्वाची बैठक पार पडली. मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विचार केला पाहिजे की, आरक्षण टिकणारं हवंय? की दिलेलं हवंय?” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.