महाराष्ट्राच्या राजकारणात दसऱ्याच्या दिवशी विचारांचं सोनं लुटण्याची परंपरा आहे. राज्यात दसऱ्याच्या दिवशी आज (२४ ऑक्टोबर) अनेक राजकीय सभा होत आहे. त्याच दरम्यान तरुणांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दसरा सणाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली पुणे ते नागपूर तब्बल ८०० किलो मीटरच्या युवा संघर्ष यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. त्या निमित्ताने रोहित पावरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेस हार अर्पण करत आशीर्वाद घेतला.