मराठा आरक्षणाचा विषयामुळे राज्यात राजकारण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली मुदतही आता संपली आहे. त्यामुळे आजच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरक्षणावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. यावेळी आरक्षणावर बोलताना शिंदेंनी केलेल्या एका कृतीची चर्चा रंगली आहे.