काल (२५ ऑक्टोबर) ठाकरेंच्या आणि शिंदे गटाच्या दोन्ही शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडले. यानंतर उद्धव ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केलीये. “ठाकरेंचं भाषण रटाळ होतं, देश मोदींना कुटुंब मानतोय, मोदींना परिवाराचा प्रमुख अशी भावना आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी काहीही म्हटलं तरी, इंडिया आघाडीत उद्धव ठाकरे गेले आहेत, त्यामुळे ते शरद पवार आणि काँग्रेसचे वकील आहेत. उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर खुलासा उद्धव ठाकरे यांनी केला नाही” असं बावनकुळे म्हणालेत.