मराठा आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. २५ ऑक्टोबरपासून पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. या दरम्यान, आता मराठा आरक्षणाबाबत विरुद्ध भूमिका घेणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्च्याचा कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.