वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या तोडफोडीनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत मराठा आरक्षण आंदोलनातील नेते मनोज जरांगे यांच्या अटकेची मागणी केली. यानंतर “आमचा समाज शांततेच आहे. आंदोलन शांततेत चालू आहे, शांततेत चालू राहील. कुठेही उद्रेक करण्याचा उद्देश मराठा समाजाचा नाही”, असं जरांगे पाटील म्हणाले. पण नेमकं घडलं काय? जाणून घेऊयात..