राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलेलं असतानाच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. “यापूर्वीही मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्यसरकारने घेतलेला निर्णय हा केंद्राला विचारून नव्हता. आज जी परिस्थिती आहे, त्याला जबाबदार राज्य सरकार आहे. आरक्षण देण्याची ऐपत नसल्याने सरकारने राजीनामा द्यावा. राज्याला अधिकार नसताना त्यांनी कुठल्या भरवशावर मराठ्यांना शब्द दिला? जरांगे पाटील यांनी ४० दिवस सरकारवर विश्वास का ठेवला? राज्य सरकार या काळात केंद्राला भेटायला गेले नाही. साप गेल्यावर आता लाठी मारून काय उपयोग?” अशी टीका करत सवालही विचारले.