पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीतील भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. याला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “ज्यांनी नऊ वर्ष हा देश शेतीच्या दृष्टीने, व्यापाराच्या दृष्टीने, उद्योजकांच्या दृष्टीने, गुंतवणुकीच्या दृष्टीने अतिशय गर्तेत लोटलेला आहे त्यांनीच टीका करणे चुकीचे आहे. शरद पवारांवर टीका करण्याअगोदर स्वतःचं आत्मपरीक्षण नरेंद्र मोदी यांनी करावं” असं दानवे म्हणालेत.