Ujjwal Nikam: आमदार अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी सुधारित वेळापत्रक तयार केले आहे. या वेळापत्रकानुसार विधिमंडळाच्या हिवाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनांच्या काळात सुनावणी होणार नसल्याने ही प्रक्रिया चार-पाच महिने चालण्याची शक्यता नाही. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय या वेळापत्रकास मान्यता देणार का, हा प्रश्न आहे. आज (३० ऑक्टोबर) यावर सुनावणी होणार आहे. याबद्दल विशेष सरकारी वकील ॲड. उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. rahul narvekar