मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागत आहेत. या पार्श्वभूमीवर शांतता राखण्याचं आवाहन राजकीय नेत्यांकडून केलं जात आहे. आमदार बच्चू कडू यांनी देखील हे आवाहन केलं असून आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते स्वतः मैदानात उतरणार आहेत. ६ नोव्हेंबरपासून जिजाऊंच्या जन्मस्थळी सिंदखेड राजा येथे रक्तदान करून मराठा आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याचं ते म्हणाले.