मराठा आरक्षणासाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषणाला बसले आहेत. त्याच दरम्यान मराठवाड्यातील बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत सोमवारी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या सर्व घडामोडी दरम्यान आज (३१ ऑक्टोबर) पुण्यातील कोंढवा परिसरात द मुस्लिम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक गफूर पठाण यांच्या नेतृत्त्वाखाली मुस्लिम समाजातील नागरिक लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत.