मराठा आरक्षणवार तोडगा निघत नाही तोपर्यंत रायकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. राजकीय नेत्यांच्या गाड्या, घरं, कार्यालयं जाळण्यापर्यंत आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. आमदार शहाजी बापू पाटलांना देखील आंदोलकांच्या या आक्रोशाला सामोरं जावं लागलं आहे. पंढपुरात मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी अडवत त्यांना गावात प्रवेश नाकारला. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.