मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून अंतरवली येथे सुरू असलेले उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर मागे घेतले. जरांगे पाटील यांच्या या निर्णयाचे स्वागत करताना आजच्या निर्णयामुळे हे सरकार सर्वसामान्यांचे ऐकणारे, त्यांना न्याय देणारे असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.