मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित झालं असलं तरी राज्यातील मराठा समाज अजून शांत झालेला नाही. या आरक्षणाच्या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. जामखेडमधील खर्डा भागातील संतोष साबळे या तरुणाने मराठा आरक्षणासाठी मोबाईल टॉवरवर चढत आंदोलन केलं आणि आरक्षण प्रश्नावर तोडगा निघाला नाही तर आत्महत्या करेल असा इशाराही दिला.