देशभरात दिवाळी सण मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाच आयोजन केले जात आहे. त्याच दरम्यान कोथरूडचे ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमाला सर्व पक्षीय नेत्यांनी हजेरी लावून मिसळ पाव, जिलेबी खाण्याचा आनंद लुटला. या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते कोथरूडचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी देखील हजेरी लावली होती.