बारामतीमध्ये धनगर आरक्षणासाठी आंदोलक चंद्रकांत वाघमोडे हे आमरण उपोषणाला बसले आहेत. सरकारच्या वतीने कोणताही प्रतिनिधी उपोषणस्थळी भेट देण्यासाठी आला नाही, त्यामुळे आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतंय. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी दुसऱ्या दिवशी देखील उपोषणस्थळी भेट दिली. त्यांनी कालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांना फोन लावून उपोषण सुरू असल्याची माहिती दिली.