बीडमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान अनेक निरपराध तरुणांवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली होती. यासंदर्भात आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज (१५ नोव्हेंबर) पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली. “ज्यांचा आंदोलनात सहभाग नव्हता त्यांच्यावर कारवाई करू नका” अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.