देशभरात दिवाळी सण साजरा करण्यात येतोय. यादरम्यान आज (१५ नोव्हेंबर) पुण्यातील सर्वपक्षीय नेत्यांसाठी शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी वाडेश्वर कट्ट्याचं आयोजन केले होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते. दररोज एकमेकावर आरोप प्रत्यारोप करणारे नेते मंडळी दिवाळी सणांच्या निमित्ताने एकत्रित आले आणि राजकारणा पलीकडील गप्पा रंगल्याचे पाहण्यास मिळाले.