पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका, विद्यापीठांच्या सिनेट निवडणुकांसाठी मनसेने आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी (१६ नोव्हेंबर) ठाण्यात आले होते. यावेळी “जात ही गोष्ट अनेकांना प्रिय असते अनेकांना ती गोष्ट आवडते. जात आवडण्याची कारणं वेगवेगळी असतात. घरातली संस्कृती, खाद्यसंस्कृती हे विषय त्यामागे असतात. स्वतःच्या जातीवर अभिमान, आपलेपणा असणं हे महाराष्ट्रात होतं. १९९९ मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्यानंतर स्वतःच्या जातीपेक्षा दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे महाराष्ट्रात सुरु झालं असा आरोप राज ठाकरेंनी आज पुन्हा एकदा केला”