पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका, विद्यापीठांच्या सिनेट निवडणुकांसाठी मनसेने आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी (१६ नोव्हेंबर) ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलही वक्तव्य केले. “मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे, कालांतराने समोर येईलच” असं राज ठाकरे म्हणाले आहेत.