आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले होते. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात भारताचा ६ गडी राखून पराभव केला. यानंतर निराश झालेल्या भारतीय संघाची पंतप्रधान मोदींनी थेट ड्रेसिंग रूममध्ये जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांचं कौतुक केलं. यावेळी संघातील खेळाडू भावूक झालेले दिसून आले.