बागेश्वर धामचे पिठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी अखेर देहूतील मंदिरात येऊन जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतलं. काही दिवसांपूर्वी धीरेंद्र शास्त्री यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त टिप्पणी केली होती, यावरून वाद रंगला होता. पुण्यात सुरू असलेल्या त्यांच्या कार्यक्रमाला देखील वेगवेगळ्या संघटनांनी विरोध दर्शवला. अखेर तुकाराम महाराजांचे दर्शन घेत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.