दिशाभूल करणारे फसवे दावे बंद न केल्यास अशा प्रत्येक उत्पादनामागे एक कोटी रुपयांचा दंड ठोठावू, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद कंपनीला दिला आहे. त्यावर आता योगगुरू रामदेव बाबा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, पतंजलीच्या फसव्या जाहिरातींविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने याचिका दाखल केली होती. त्यावर मंगळवारी सुनावणी पार पडली.