Ajit Pawar in Pune: प्रशासकीय अधिकाऱ्यांनी खर्चाबद्दल विचारताच अजित पवार काय म्हणाले?; जाणून घ्या
पुण्यातील सारथी मुख्यालय आणि शिक्षक भवन या बांधकामाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्या सह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी, “दादा आम्ही जेवढा खर्च होणार आहे. तेवढाच खर्च मागत आहोत” असं एक अधिकारी म्हणाल्यावर अजित पवार म्हणाले की, “नाव होतंय ना,तेच कमवयाचं असतं. पैसा तर काय वर घेऊन जाणार नाही. पण नाव तर कायमचं राहतं” असं पवार म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.