Jitendra Awhad:”ज्या पवारांना तुम्ही घरातून हुसकवण्याचं काम केलं,त्यांना…”;आव्हाड तटकरेंवर संतापले
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांचावर टीका केलीये. “ज्या पवार साहेबांना तुम्ही त्यांचाच घरातून हुसकवण्याचे काम करता आणि कशाला त्यांना दैवत म्हणून त्यांचा अपमान करता. शरद पवारांचा पक्ष, निशाणी ताब्यात घ्यायचं म्हणताय आणि कसलं आलंय तुमचं प्रेम? अब्दुल रहमान अंतुले यांनी तुम्हाला राजकीय जन्म दिला त्यांना तुम्ही झोपवायला तयार झाला होतात.” असं म्हणत आव्हाडांनी तटकरेंवर टीका केलीये.