त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पासमोर मिठाई, फराळाचे तिखट, गोड पदार्थ तसंच विविध प्रकारची फळं आणि भाज्या असे तब्बल ४५१ प्रकारचे मिष्टान्न महानैवेद्य म्हणून दाखविण्यात आले. लाडक्या बाप्पासमोर मांडलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचा भव्य अन्नकोट पाहण्याकरिता पुणेकरांनी सकाळपासूनच मोठ्या संख्येने मंदिरात गर्दी केली होती.