संविधान बदलण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकेला उत्तर देताना हा चुनावी जुमला असल्याचं म्हटलं आहे. संविधान कोणाचा बाप बदलू शकत नाही, अशी टीकास्त्रही त्यांनी डागलं. रविवारी (२७ नोव्हेंबर) ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.